देवीची यात्रा आणि बैलगाडा शर्यतीचं आयोजन करणं पडलं महागात; पोलिसांची कारवाई

हायलाइट्स: यात्रा-जत्रांना परवानगी नसतानाही केलं आयोजन मिरज ग्रामीण पोलिसांनी आयोजकांवर केली कारवाई पोलिसांनी सात जणांवर दाखल केले गुन्हे सांगली : करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यात्रा-जत्रांना परवानगी नसतानाही मिरज तालुक्यातील भोसे येथे यल्लमा देवीची यात्रा भरवल्याबद्दल, तसंच बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्याबद्दल मिरज ग्रामीण पोलिसांनी आयोजकांवर कारवाई केली आहे. (Bullock Cart Race In Maharashtra)प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल पोलिसांनी …

Read more

प्रवाशांच्या जीवाशी खेळ! मद्यप्राशन करुन चालवत होता एसटी बस, जेवणाच्या डब्यातही आढळली दारू

हायलाइट्स: चालकाच्या जेवणाच्या डब्यात आढळली दारू कळमनुरी घराच्या एसटी कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा प्रवाशांनी दाखल केली तक्रार हिंगोली: राज्यात सध्या एसटी महामंडळाचे आंदोलन सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा मुद्दा पेटलेला असताना हिंगोलीच्या कळमनुरी आगारातील एका एसटी चालकाने चक्क मद्यप्राशन करून बस चालवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आता या बस चालकाविरुद्ध हिंगोली आगारांमध्ये तक्रार करण्यात आली आहे. एसटी …

Read more

मराठवाड्याच्या चिंतेत भर! करोनाचा पॉझिटिव्ह रेट वाढला; ‘या’ जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण

औरंगाबादः राज्यातील करोनाची वाढती रुग्ण संख्या चिंतेचे कारण ठरत असताना आता मराठवाड्यातील आकडा या चिंतेत आणखी भर टाकणारा ठरत आहे. कारण मराठवाड्याचा एकूण पॉझिटीव्ह रेट ११.१२ झाला आहे. विशेष म्हणजे नांदेड जिल्हा मराठवाड्यातील सर्वाधिक पॉझिटीव्ह रेट असलेला ठरला आहे. मराठवाड्यात शनिवारी २ हजार ६५ रुग्ण सापडले आहेत. तर जिल्ह्याचा पॉझिटीव्ही रेटचा विचार केला तर औरंगाबाद …

Read more

अमरावतीत शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला; राणा दाम्पत्य नजरकैदेत

अमरावतीः शहरातील नवनिर्मित राजापेठ उड्डाणपुलावर युवा स्वाभिमान पक्षाच्या पुढाकाराने १२ जानेवारीच्या मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला होता. मात्र, हा पुतळा बसविण्यासाठी कुठल्याच प्रकारची परवानगी न घेण्यात आल्याने अखेर शनिवारी मध्यरात्री पोलीस बंदोबस्तात हा पुतळा हटविण्यात आला आहे. दरम्यान, आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. युवा स्वाभिमान पक्षाच्या …

Read more

… म्हणून लहान मुलांना संसर्ग होण्याचे प्रमाण वाढतेय; आरोग्य विभागाने सांगितलं कारण

हायलाइट्स: लहान मुलं आजारी पडण्याचे प्रमाण वाढले घरातील व्यक्तीकडूनच लहान मुलांना संसर्ग करोनाचे नियम न पाळल्याचा बसतोय फटका हिंगोली: मागील दहा ते बारा दिवसांपासून लहान मुलांमध्ये सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे दिसून येत आहेत. मोठ्या व्यक्तीकडून लहान मुलांना आजाराचा संसर्ग होत असल्याचे आरोग्य विभागाच्या पाहणीत आढळून आले आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप, घसा खवखवणे इत्यादी …

Read more

उसने पैसे घेतलेला वाद टोकाला गेला; मित्रानेच केला कत्तीने वार

हिंगोलीः मुलीच्या लग्नासाठी दिलेले उसने पैसे परत देण्यावरुन झालेला वाद इतका टोकाला गेला की मित्राने जबर मारहाण केल्याचा प्रकार हिंगोली जिल्ह्यात उघडकीस आला आहे. मुलीच्या लग्नासाठी दिलेले उसने पैसे का देत नाही या कारणावरून बाप लेकास मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत मुलाच्या डोक्यात कत्ती मारल्याने डोके फुटले तर बापाच्या डाव्या हाताच्या बोटाला गंभीर दुखापत …

Read more

‘अजितदादांवर विश्वास नसेल तर आदित्य ठाकरेंकडे मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार सोपवा’

लातूर : ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीस आराम पडावा,’ अशी सदिच्छा व्यक्त करीत ‘अजितदादांवर किंवा ‘राष्ट्रवादी’वर विश्वास नसेल, तर आदित्य ठाकरेंकडे मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार सोपवावा, पण राज्याला पूर्णवेळ मुख्यमंत्री द्या,’ अशी मागणी माजी मंत्री व आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली आहे. गेल्या वर्षी २२ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एक शस्त्रक्रिया झाली. तेव्हापासून पूर्णवेळ …

Read more

चालू लिफ्ट जमिनीवर कोसळली, दुर्घटनेत एक जण ठार, तीन जखमी

अहमदनगर : अहमदनगरच्या मार्केट यार्ड भागातील एका इमारतीत लिफ्ट कोसळून एक युवक ठार झाला. तर तिघे जखमी झाले आहेत. त्यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मदतकार्य सुरू केले. या अपघातात शुभम झेंडे (वय १९) हा युवक ठार झाला. तर ओंकार निमसे (वय १९), प्रिया पवार (वय ४०) व …

Read more

राजीनामा देताना विराटचं इमोशनल लेटर, सरतेशेवटी धोनीचे आभार, म्हणाला, ‘त्याच्यामुळेच…!’

मुंबई : भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. टी ट्वेन्टी आणि एकदिवसीय संघाचं कर्णधारपद सोडल्यानंतर आता कोहलीने कसोटी संघाचं कर्णधारपद देखील सोडण्याचा निर्णय घेतलाय. विराट कोहली दक्षिण आफ्रिकेत कसोटी सामना खेळून भारतात परतला. या मालिकेत टीम इंडियाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर धक्कादायकरित्या त्याने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिलाय. …

Read more

Virat kohli : ७ वर्ष अखंड मेहनत, १२० टक्के क्षमतेने खेळलो, आता पूर्णविराम देण्याची वेळ, विराटची राजीनामा पोस्ट जशीच्या तशी!

मुंबई : एकदिवसीय आणि टी ट्वेन्टीनंतर विराट कोहलीने (Virat Kohli) कसोटी संघाचं कर्णधारपद देखील सोडण्याचा निर्णय घेतलाय. आज ट्विटरवरुन आपल्या कसोटी कर्णधारपदाचा त्याने राजीनामा दिलाय (virat kohli step down). दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका (India vs South Africa Test Series) गमावल्यानंतर त्याने हा निर्णय घेतलाय. कालच भारताला दक्षिण आफ्रिकेविरोधात २-१ ने पराभवाचा धक्का सहन करावा लागला. …

Read more